Header Ads

जीवनात ही कला आलीच पाहिजे.

⭐जीवनात ही कला येणे आवश्यक आहे⭐

⭐मित्रांनो मी तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर सांगणार आहे.

⭐पोहणे ही एक कला आहे ही कला आलीच पाहिजे.

⭐पोहण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या |





⭐वजन करते कमी :- तुम्ही जर वन कमी करण्याचा प्रयत्न करत आसताल,तर आपल्या शरीरासाठी पोहणे हा एक उपाय आहे.


⭐पोहताना आपण संपूर्ण शरीराची हालचाल करत असतो. त्यामुळे साहजिकच तुमच्या प्रत्येक अवयावाचा व्यायाम होतो. ज्यावेळी आपण पोहतो. पोहताना पाणी कापत आपण पुढे जातो. असे करण्यासाठी तुमच्या शरीरात असलेली सगळी उर्जा वापरली जाते. तुमच्या शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. तुमच्या शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय तुमचा बांधा सुडौल होतो. त्यामुळे आठवड्यातून अगदी तीनवेळा तरी तुम्ही पोहायला जा. तुम्हाला शरीरात झालेला फरक नक्की जाणवेल.
अस्थमा असणाऱ्यांसाठी पोहणे वरदान आहे. श्वसानाशी निगडीत असलेला हा आजार श्वसानासाठी लागणारे नवे टिश्यू तयार करण्यास पोहणे मदत करते. पोहण्यामुळे अस्थमा असणाऱ्यांना त्याचा त्रास कमी होतो. अस्थमाची सतत असेलेली भीती कमी करण्यास पोहणे मदत करते.
जगभरातील डॉक्टर आणि तज्ञ पोहण्याच्या फायद्यांची पुष्टी करतात. अनेक संशोधनांच्या निकालांमध्येही, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोहण्याचे फायदे सिद्ध झाले आहेत.
आपले संपूर्ण शरीर आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली कार्य करण्यासाठी पोहणे हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. एक तास पोहणे तुमच्या हाडांवर आणि सांध्यांवर कोणताही परिणाम न होता, धावण्याइतक्या कॅलरीज बर्न करतात.



⭐पोहण्याच्या गोल हात पद्धत, कुशीवरील पद्धत (साइड स्ट्रोक), सरपट पद्धत व पाठीवरील पद्धत (बॅक स्ट्रोक) ह्या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या मूलभूत पद्धती आहेत. ह्याच पद्धतींमध्ये काहीसे फेरफार होऊन ट्रजन पद्धत, फुलपाखरी (बटरफ्लाय) पद्धत, कुशीवरील वरचे हात (ओव्हरआर्म साइड स्ट्रोक) इ. अनेक उपप्रकार निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये मात्र चारच पद्धती अधिकृत मानल्या जातात त्या अशा : गोल हात पद्धत, पाठीवरील पद्धत, फुलपाखरी पद्धत व मुक्त शैली (फ्री स्टाइल).
‘फ्री स्टाइल’ ही नावाप्रमाणेच पोहण्याची मुक्त शैली असून, त्यात स्पर्धक जलतरणपटू त्याला हव्या त्या पद्धतीने पोहू शकतो. आधुनिक स्पर्धांमध्ये स्पर्धक ‘फ्रंट क्रॉल’ पद्धतीचाच विशेषतः वापर करतात, त्यामुळे कित्येकदा ‘फ्रंट क्रॉल’लाच ‘फ्री स्टाइल’ असे म्हटले जाते. वरील पद्धतींची पुढे थोडक्यात माहिती दिलेली आहे :
⭐होय खरे आहे. पोहणे सायकल शिकण्यासारखे आहे. सायकल शिकताना आपल्या सुरुवात तरी त्रास होतो. आपले सायकल संतुलित पणे चालवणे येत नाही. परंतु सरावाने सायकल शिकणे मेंदूची नैसर्गिक क्रिया समावेश होतो. मेंदूची हीच खरी विशेष ता आहे. परंतु जर मेंदूला इजा झाली तर ही गोष्ट आपण विसरू शकतो. पोहण्याचा पण असेच आहे.पोहणे सरावाने मेंदूची नैसर्गिक क्रिया होऊ शकते. आपण पोहणे शिकलात आणि बरीच वर्ष पोहणे बंद केले आणि बऱ्याच वर्षानंतर पोहणे चालू केले. तरी तुम्हास पोहो न्यास अडचण येणार नाही. विनंती प्रश्नासाठी धन्यवाद….🙏🙏

धन्यवाद मित्रांनो मी तुम्हाला पोहणे ही कला आहे.होय खरे आहे. पोहणे सायकल शिकण्यासारखे आहे. सायकल शिकताना आपल्या सुरुवात तरी त्रास होतो. आपले सायकल संतुलित पणे चालवणे येत नाही. परंतु सरावाने सायकल शिकणे मेंदूची नैसर्गिक क्रिया समावेश होतो. मेंदूची हीच खरी विशेष ता आहे. परंतु जर मेंदूला इजा झाली तर ही गोष्ट आपण विसरू शकतो. पोहण्याचा पण असेच आहे.पोहणे सरावाने मेंदूची नैसर्गिक क्रिया होऊ शकते. आपण पोहणे शिकलात आणि बरीच वर्ष पोहणे बंद केले आणि बऱ्याच वर्षानंतर पोहणे चालू केले. तरी तुम्हास पोहो न्यास अडचण येणार नाही. विनंती प्रश्नासाठी धन्यवाद….🙏🙏 

धन्यवाद मित्रांनो मी तुम्हाला पोहणे याविषयी माहिती दिली आहे.
हि तुम्हाला कशी वाटली ते जरुर कळवा.खाली तुमचा अभिप्राय नोंदवा ही नम्र विनंती.🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.